Stock News: रेल्वेशी संबंधित 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होणार? मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता

Stock News: गेल्या 6 महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 50 टक्क्यांची वाढ झाली आहे.
Stock News
Stock NewsSakal
Updated on

Stock News: सरकारी रेल्वे कंपनी रेल विकास निगम लिमिटेडच्या (RVNL) शेअर्समध्ये सध्या चांगली अॅक्शन दिसून येत आहे. या कंपनीला मोठा रेल्वे प्रकल्प मिळणार आहे. त्याचा परिणाम शेअरवर होत असून सध्या या शेअरमध्ये चांगली तेजी दिसून येत आहे. सुमारे 123 कोटी रुपयांच्या रेल्वे प्रोजेक्टसाठी रेल विकास निगम लिमिटेडला ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे.

या संयुक्त उपक्रमाला KRDCL-RVNL प्रोजेक्टसाठी L1 बिडर घोषित करण्यात आले आहे. या प्रोजेक्टअंतर्गत, कंपनीने वर्कला शिवगिरी रेल्वे स्थानकाच्या (केरळ) रिडेव्हलमेंटसाठीची बोली जिंकली आहे. ही ऑर्डर 30 महिन्यांत पूर्ण होईल. JVमध्ये कंपनीचा हिस्सा 49% आहे, तर उर्वरित 51% KRDCL च्या मालकीचा आहे.

Stock News
GST Amendment Bill: राज्यसभेत मंजूर केले GSTचे दुसरे दुरुस्ती विधेयक; काय बदल होणार?

एका वर्षात 165% परतावा

रेल विकास निगम लिमिटेडचा शेअर हा लाँग टर्ममध्ये गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. या स्टॉकमध्ये 2023 मध्ये आतापर्यंत 165 टक्क्यांहून अधिक वाढ दिसली आहे. गेल्या 6 महिन्यांत स्टॉकमध्ये सुमारे 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गेल्या 5 वर्षांच्या कामगिरीवर नजर टाकली तर स्टॉक 800 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. बीएसईवर कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 38,260 कोटी आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 199.35 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांक 56.15 रुपये आहे.

Stock News
ShareChat layoff: शेअरचॅटने एकाच वेळी 200 कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()