Wipro Bonus Share: विप्रोने तोडले सर्व रेकॉर्ड; सलग चौदा वेळा दिला बोनस शेअर, भागधारक होणार मालामाल

Wipro Announces Bonus Shares: आयटी कंपनीने सर्वाधिक वेळा बोनस शेअर्स दिले आहेत. कंपनीने एकूण 14 वेळा बोनस शेअर्स दिले आहेत. 17 ऑक्टोबर रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत एक बोनस जाहीर करण्यात आला.
Wipro Bonus Share
Wipro Bonus ShareSakal
Updated on

Wipro Announces Bonus Shares: आयटी कंपनीने सर्वाधिक वेळा बोनस शेअर्स दिले आहेत. कंपनीने एकूण 14 वेळा बोनस शेअर्स दिले आहेत. 17 ऑक्टोबर रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत एक बोनस जाहीर करण्यात आला. 14 वेळा बोनस देणारी विप्रो ही एकमेव कंपनी आहे.

विप्रोने कंपनीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीने 2019 मध्ये तीनसाठी एक बोनस शेअर दिला होता. 2017 मध्ये एका शेअरसाठी एक बोनस शेअर देण्यात आला होता, 2010 मध्ये कंपनीने तीनसाठी दोन बोनस शेअर्स दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.