Wipro Share Price: विप्रोच्या शेअर्समध्ये वाढ, गुंतवणूक करावी का? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

गेल्या दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये कंपनीच्या शेअरमध्ये 7 टक्क्यांची वाढ झाली आहे.
Wipro
Wipro Sakal
Updated on

Wipro Share Price: विप्रोचो (Wipro) शेअर्स सध्या अतिशय मजबूत दिसत आहेत. सोमवारी 4 टक्क्यांनी वाढून विप्रोचे शेअर्स बीएसईवर इंट्रा-डे ट्रेडमध्ये 420.10 रुपयांच्या 10 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले.

केवळ गेल्या दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये या शेअर्समध्ये 7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीच्या जून तिमाहीचे (Q1FY24) निकाल आल्यापासून, तिच्या स्टॉकमध्ये तेजी दिसून आली आहे.

30 जून रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा नफा वार्षिक आधारावर जवळपास 12 टक्क्यांनी वाढून 2,870 कोटी रुपये झाला आहे. पण तिमाही आधारावर कंपनीच्या नफ्यात 6.6 टक्क्यांनी घट झाली आहे.

विप्रोचे शेअर्स 15 सप्टेंबर 2022 पासून उच्चांकावर होते. 17 ऑगस्ट 2022 रोजी शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला जो की 444.65 रुपये होता. 30 जून 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत, कंपनीच्या आयटी व्यवसायातील उत्पन्न तिमाही आधारावर 2.1 टक्क्यांनी घसरले.

त्याच वेळी, कॉस्टेंट करन्सी टर्ममध्ये तिमाही आधारावर कंपनीच्या कमाईमध्ये 2.8 टक्क्यांची घसरण झाली. या कालावधीत कंपनीचा एबिट 16 टक्क्यांवर होता.

Wipro
Share Market : 72 कोटींच्या ऑर्डरमुळे 'या' शेअरमध्ये दिसतेय मजबूत तेजी; तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का?

कमी होत असलेली मागणी आणि जागतिक बाजारपेठेतील आव्हानांमुळे आयटी सेक्टर दबावाखाली राहू शकतो असे रेलिगेअर ब्रोकिंगचे म्हणणे आहे. पण विप्रोच्या बाबतीत लाँग टर्म आऊटलूक सुधारण्याची अपेक्षा आहे.

कारण मागणी पुन्हा सुरु होण्यासोबतच ऑटोमेशन आणि जनरल एआय आधारित उत्पादने आणि सोल्यूशन्समधील गुंतवणूक कंपनीच्या वाढीसाठी मदत करेल. रेलिगेअर ब्रोकिंगने विप्रोवर 432 रुपयांच्या टारगेटसह 'होल्ड' रेटिंग कायम ठेवले आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Wipro
Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.