Wonderla Holidays Share: वंडरला हॉलिडेजच्या (WHL) शेअर्समध्ये 10 टक्क्यांची मजबूत तेजी पाहायला मिळाली. शेअर बाजार अस्थिर असताना ही तेजी विशेष मानली जात आहे. या शेअरने इंट्राडेमध्ये 887.70 च्या विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला.
सध्या हा शेअर 8.34 टक्क्यांच्या वाढीसह 875.10 रुपयांवर ट्रेड करत आहे. कंपनीला चेन्नई प्रकल्पासाठी राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. या बातमीनंतरच या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून आली. कंपनीने चेन्नई प्रकल्पासाठी तामिळनाडू सरकारकडून सर्व आवश्यक अप्रुव्हल/क्लियरंस/एनओसी मिळवल्याचे वंडरला हॉलिडेजने एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे.
वंडरला हॉलिडेज चेन्नईपासून 45 किमी अंतरावर असलेल्या जुन्या महाबलीपुरम रोडवर एक मनोरंजन पार्क सुरू करण्यासाठी सज्ज आहे. त्यात सुमारे 400 कोटीची गुंतवणूक आहे, जे चेंगलपेट जिल्ह्यातील थिरुपोर तालुक्यातील इलूर गावात 62 एकर पसरलेले आहे. वंडरला हॉलिडेज बेंगळुरू पार्कमधील एका रिसॉर्टसह तीन मनोरंजन पार्क चालवते.
29 जून 2022 रोजी, कंपनीने ओडिशाच्या खोर्धा जिल्ह्यातील कुंभारबस्ता गावात मनोरंजन पार्क प्रोजेक्टसाठी 50.63 एकर जमीन भाड्याने देण्यासाठी ओडिशा सरकारसोबत करार केला होता.
गेल्या एका महिन्यात वंडरला हॉलिडेजच्या शेअर्समध्ये 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या 6 महिन्यांत या शेअरने 94 टक्के परतावा दिला आहे. या वर्षात कंपनीचे शेअर्स आतापर्यंत 150 टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 142 टक्के नफा झाला आहे. त्याच वेळी, गेल्या 3 वर्षांत 462 टक्के इतका दमदार नफा दिसून आला.
नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.