Zee Entertainment: झी एंटरटेनमेंटचा शेअर कोसळला; एका अहवालानंतर कंपनीचे शेअर 10 टक्क्यांनी घसरले

Zee Entertainment Share Price: आज सकाळी शेअर बाजार सुरू होताच झी एंटरटेनमेंटचे शेअर्स घसरले. कालच्या एका अहवालात असे म्हटले आहे की झी एंटरटेनमेंटचे सोनी समूहासोबतचे विलीनीकरण रद्द केले जाऊ शकते. या अहवालानंतर मंगळवारी सकाळी झी एंटरटेनमेंटच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांची घसरण झाली आहे.
Zee Entertainment Share Price
Zee Entertainment Share PriceSakal
Updated on

Zee Entertainment Share Price: आज सकाळी शेअर बाजार सुरू होताच झी एंटरटेनमेंटचे शेअर्स घसरले. कालच्या एका अहवालात असे म्हटले आहे की झी एंटरटेनमेंटचे सोनी समूहासोबतचे विलीनीकरण रद्द केले जाऊ शकते. या अहवालानंतर मंगळवारी सकाळी झी एंटरटेनमेंटच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांची घसरण झाली आहे.

झी एंटरटेनमेंटचा शेअर आज लोअर सर्किटमध्ये रु 249.75 वर उघडला, जो मागील सत्राच्या 277.45 च्या तुलनेत 10 टक्क्यांनी खाली आला आहे.

विलीनीकरण रद्द होऊ शकते

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, सोनी समूह आपल्या भारतीय युनिटचा झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेसमधील विलीनीकरण करार रद्द करण्याचा विचार करत आहे.

या कराराची माहिती असलेल्या लोकांचा हवाला देत ब्लूमबर्गने आपल्या अहवालात म्हटले आहे की, सोनी समूह नेतृत्वाच्या मुद्द्यावर हा करार रद्द करू शकते. विलीनीकरणानंतर झीचे सीईओ पुनित गोएंका कंपनीचे नेतृत्व करतील की नाही हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.

Zee Entertainment Share Price
TATA Group: भारत मालदीवच्या तणावादरम्यान टाटांचा मोठा निर्णय; लक्षद्वीपमध्ये बांधणार 2 रिसॉर्ट

डील बंद करण्यासाठी 20 जानेवारीच्या अंतिम मुदतीपूर्वी नोटीस दाखल करण्याची सोनीची योजना आहे. त्यात म्हटले आहे की विलीनीकरणासाठी आवश्यक असलेल्या काही अटींची पूर्तता झालेली नाही. मात्र, त्यावर दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू असून मुदतीपूर्वीच तोडगा निघू शकतो.

डिसेंबरमध्ये दोन्ही कंपन्यांना विलीनीकरण पूर्ण करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. विलीनीकरणानंतर, झी एंटरटेनमेंट आणि सोनी 10 अब्ज डॉलर्सची एक विशाल मीडिया कंपनी म्हणून उदयास येऊ शकतात. मात्र या कराराबाबत अजूनही अनिश्चितता आहे.

Zee Entertainment Share Price
SBI Report: एसबीआयचा दावा! देशात आर्थिक विषमता झाली कमी, करदात्यांच्या संख्येत मोठी वाढ

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.