Zen Technologies Share: झेन टेक्नॉलॉजीजला मिळाली 100 कोटींची ऑर्डर, शेअर्समध्ये अप्पर सर्किट

Zen Technologies Share: जून तिमाहीत कंपनीची विक्री 3.5 पटीने वाढून 132.45 कोटी झाली आहे
Zen Technologies shares in news as firm wins order from defence ministry
Zen Technologies shares in news as firm wins order from defence ministry Sakal
Updated on

Zen Technologies Share: झेन टेक्नॉलॉजीजला (Zen Technologies) संरक्षण मंत्रालयाकडून सुमारे 100 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर अत्याधुनिक फोर्स ऑन फोर्स टँक ट्रेनिंग सिस्टीमसाठी आहे. ऑर्डर मिळाल्यानंतर, कंपनीचे शेअर्स गुरुवारी सकाळी बीएसईवर 675.15 रुपयांवर खुले झाले.

त्यानंतर, शेअर्स 5% पेक्षा जास्त वाढीसह 708.90 रुपयांच्या उच्चांकासह अप्पर सर्किटवर पोहोचला. एनएसईवर शेअर 670 रुपयांवर उघडला आणि दिवसभरात 707 रुपयांपर्यंत गेला आणि अप्पर सर्किटला धडकला.

बीएसईवर स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 912.55 रुपये आणि नीचांकी 175.50 रुपये आहे. तर एनएसईवरील उच्चांक 911.40 रुपये आणि निचांक 175.15 रुपये आहे. अत्याधुनिक फोर्स ऑन फोर्स टँक ट्रेनिंग सिस्टीम ही एक इनोव्हेटीव्ह सिस्टम आहे. झेन टेक्नॉलॉजीजने ही सिस्टम डिझाईन, डेव्हलप आणि टेस्ट केले आहे.

या वर्षी सप्टेंबरमध्ये कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून 227.65 कोटीची एँन्टी-ड्रोन सिस्टम पुरवण्याची ऑर्डर मिळाली होती. वॉरंटीनंतर, 43.22 कोटी खर्चाच्या करारामध्ये कॉम्प्रिहॅन्सिव मेंटेनंन्स कॉन्ट्रॅक्टचा (CMC) समावेश आहे. शिवाय संरक्षण मंत्रालयाकडून 123.3 कोटीची ऑर्डरही मिळाली.

Zen Technologies shares in news as firm wins order from defence ministry
Cello World IPO: 30 ऑक्टोबरला येतोय सेलो वर्ल्ड लिमिटेडचा आयपीओ; संपूर्ण माहिती एका क्लिकवर

चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) झेन टेक्नॉलॉजीजचा निव्वळ नफा अनेक पट वाढीसह 47.09 कोटी झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा 7.46 कोटी होता.

जून तिमाहीत कंपनीची विक्री 3.5 पटीने वाढून 132.45 कोटी झाली आहे, जी गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत 37.07 कोटी रुपये होती. झेन टेक्नॉलॉजीज सेन्सर आणि सिम्युलेटर तंत्रज्ञानावर आधारित संरक्षण प्रशिक्षण प्रणाली डिझाइन आणि विकसित करते.

Zen Technologies shares in news as firm wins order from defence ministry
Wonderla Holidays Share: वंडरला हॉलिडेजच्या शेअर्समध्ये दमदार तेजी, काय आहे कारण?

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.