Zerodha Down: ऑनलाइन ब्रोकिंग प्लॅटफॉर्म Zerodha च्या Kite अॅपमध्ये लॉग इन करण्यात आणि डिव्हाइस कनेक्ट करण्यात अडचणी येत आहेत. Zerodha वापरकर्ते कंपनीच्या ट्रेडिंग वेबसाइट Kite वर लॉग इन करू शकत नाहीत.
कंपनीने सोशल मीडियावर ही माहिती दिली. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, काही यूजर्स काइट वेबवर लॉग इन करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना ट्रेडिंगमध्ये अडचणी येत आहेत.
गेल्या महिन्यातही कंपनी अशाच अडचणीत अडकली होती. त्यावेळी कंपनीचे अॅप किंवा वेबसाइट नीट काम करत नव्हती. अॅपच्या वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर अनेक पोस्ट टाकून याबाबत तक्रार केली होती. त्याआधी एप्रिलमध्येही कंपनीच्या अॅपमध्ये लॉग इन करण्यात अडचण आली होती.
(Zerodha users are facing issues with logging into Kite web)
Zerodha अॅपची फी सर्वात कमी आहे. म्हणूनच अधिकाधिक लोक त्यावर लॉग इन करत आहेत. सुरुवातीला हे अॅप आणि त्याची वेबसाइट चांगली चालायची. पण आता ट्रॅफिक वाढल्यामुळे ट्रेडिंग करताना अडचणी येत आहेत.
यापूर्वी एप्रिल, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये झिरोधा प्लॅटफॉर्मवर अडचणी आल्या होत्या. कधी या अॅपवर युजर्सच्या ऑर्डर्स अडकतात तर कधी त्यांची होल्डिंग्स आणि फंड दिसत नाही. जुलैमध्ये अशाच तांत्रिक समस्येमुळे BSE च्या तक्रार निवारण समितीने (GRC) प्लॅटफॉर्मवर 8225 रुपयांचा दंड ठोठावला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.