शेअर बाजार कोसळल्यानंतर 'ही' कंपनी झाली मालामाल; निकालाच्या दिवशी 8,000,00,00,000 रुपयांचा निधी जमा

Zerodha’s Kite App: 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालांदरम्यान शेअर बाजारात चार वर्षांतील सर्वात मोठी एकदिवसीय घसरण पाहायला मिळाली. मंगळवारी देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी सुमारे 6 टक्क्यांनी घसरले.
Zerodha’s Kite app
Zerodha’s Kite appSakal
Updated on

Zerodha’s Kite App: 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालांदरम्यान शेअर बाजारात चार वर्षांतील सर्वात मोठी एकदिवसीय घसरण पाहायला मिळाली. मंगळवारी देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी सुमारे 6 टक्क्यांनी घसरले. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप स्पष्ट बहुमतापासून दूर असल्याचे निवडणूक निकाल आणि ट्रेंडवरून स्पष्ट झाले आहे.

काल शेअर बाजारात मोठी घसरण झाल्यानंतर ब्रोकरेज फर्मचे सह-संस्थापक आणि सीईओ नितीन कामथ यांनी मंगळवारी शेअर केलेल्या चार्टनुसार, लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी Zerodha च्या Kite ॲपवर 8,000 कोटींहून अधिक निधी जोडण्यात आला आहे.

Zerodha’s Kite app
Stock Market Crash: 'या' 4 कारणांमुळे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला शेअर बाजार; कोरोना काळातील आठवणीला उजाळा

कामथ यांनी X वरील एका पोस्टमध्ये, “ॲक्टिव्हिटी टुडे ऑन काइट” या मथळ्यासह चार्ट शेअर केला आहे. चार्टनुसार, Kite ॲपवर जवळपास 34.5 दशलक्ष ऑर्डर देण्यात आल्या होत्या. ॲपवर 8 दशलक्षाहून अधिक लॉगिन झाले.

मोजणीच्या दिवसांच्या गोंधळामुळे भारतीय निर्देशांकांनी गेल्या चार वर्षांतील सर्वात मोठी घसरण पाहिली आणि एकाच हंगामात गुंतवणूकदारांचे सुमारे 30 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी अंतिम टप्प्यात प्रवेश करत असताना, मंगळवारी सेन्सेक्स 4,389 अंकांनी किंवा 5.74 टक्क्यांनी घसरून 72,079 वर बंद झाला, तर निफ्टी 1,379 अंकांनी किंवा 5.93 टक्क्यांनी घसरून 21,884 वर बंद झाला. निफ्टी बँकेला 4,051 अंक किंवा 7.95 टक्क्यांहून अधिक नुकसान सहन करावे लागले आणि तो 46,928 वर बंद झाला.

Zerodha’s Kite app
Share Market: युती-आघाडी सरकार शेअर बाजारासाठी वाईट असतात का? काय सांगते आकडेवारी

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com