T+0 Trade: या 25 स्टॉक्समध्ये T+0 ट्रेड सेटलमेंट 28 मार्चपासून, BSE ने जाहीर केली यादी

T+0 Trade Settlement: बदलत्या काळाशी ताळमेळ ठेवण्यासाठी सेबीने 2002 मध्ये ही सायकल T+5 वरून T+3 आणि त्यानंतर 2003 मध्ये T+2 पर्यंत आणली होती.
T+0 Trade Settlement Policy
T+0 Trade Settlement PolicyEsakal
Updated on

गुरुवारपासून (28 मार्च) सुरू होणाऱ्या T+0 सेटलमेंट सायकलसाठी पात्र असलेल्या 25 शेअर्सची यादी BSE ने नुकतीच प्रसिद्ध केली आहे.

T+0 सेटलमेंट सायकलसाठी पात्र असलेल्या शेअर्समध्ये अंबुजा सिमेंट्स, अशोक लेलँड, बजाज ऑटो, बँक ऑफ बडोदा आणि BPCL यासारख्या प्रमुख कंपन्यांंचा समावेश आहे.

सुरुवातीला, हा पर्याय 25 निवडक स्टॉक्स आणि मर्यादित ब्रोकर्ससाठी उपलब्ध असेल. सध्याच्या T+1 सेटलमेंटसोबत इक्विटी कॅश मार्केटमध्ये अतिरिक्त सेटलमेंट सायकल उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

T+0 म्हणजे त्याच दिवशी सेटलमेंट. याचा अर्थ असा की गुंतवणूकदारांना स्टॉक्सची सेटलमेंट त्याच दिवशी करता येणार आहे. जी आधी T+1 म्हणजेच एका दिवसानंतर व्हायची. T+0 मुळे गुंतवणूकदारांचा खर्च आणि वेळ वाचणार आहे.

T+0 सेटलमेंटमुळे केवळ मार्केट ऑपरेशन्सची कार्यक्षमता आणि लवचिकताच वाढणार नाही तर व्यवहारातील जोखीम देखील लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. त्यामुळे व्यापारी आणि गुंतवणुकदारांनाही याचा फायदा होणार आहे.

T+0 Trade Settlement Policy
Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार खरेदी; सेन्सेक्स 526 अंकांच्या वाढीसह बंद, कोणते शेअर्स वधारले?

BSE ने आज T+0 च्या माध्यमातून सेटल होणाऱ्या 250 स्टॉक्सची यादी शेअर केली आहे. यानुसार बजाज ऑटो, वेदांत, हिंदाल्को इंडस्ट्रीज, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), ट्रेंट, टाटा कम्युनिकेशन्स, नेस्ले इंडिया, सिप्ला, MRF, JSW स्टील, BPCL, ONGC, NMDC आणि अंबुजा सिमेंट्सचा व्यापार उद्या T+0 नुसार होईल.

बदलत्या काळाशी ताळमेळ ठेवण्यासाठी सेबीने 2002 मध्ये ही सायकल T+5 वरून T+3 आणि त्यानंतर 2003 मध्ये T+2 पर्यंत आणली होती.

T+0 Trade Settlement Policy
Tata Group IPO: कमाईची सुवर्णसंधी! टाटा शेअर बाजारात करणार धमाका; पुढील 2-3 वर्षात 8 IPO येण्याची शक्यता

T+0 सेटलमेंट सायकलसाठी पात्र स्टॉक्स

1. Ambuja Cements Ltd.

2. Ashok Leyland Ltd.

3. Bajaj Auto Ltd.

4. Bank of Baroda

5. Bharat Petroleum Corporation Ltd

6. Birlasoft Ltd

7. Cipla Ltd.

8. Coforge Ltd

9. Divis Laboratories Ltd.

10. Hindalco Industries Ltd.

11. Indian Hotels Co. Ltd.

12. JSW Steel Ltd.

13. LIC Housing Finance Ltd.

14. LTI Mindtree Ltd

15. MRF Ltd.

16. Nestle India Ltd.

17. NMDC Ltd.

18. Oil and Natural Gas Corporation

19. Petronet LNG Ltd.

20. Samvardhana Motherson International Ltd

21. State Bank of India

22. Tata Communications Ltd.

23. Trent Ltd.

24. Union Bank of India

25. Vedanta Ltd

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.