Loan Apps: ऑनलाइन कर्ज देणाऱ्या बेकायदेशीर ॲप्सना रोखण्यासाठी आरबीआय उचलणार 'हे' मोठे पाऊल

RBI: सूत्रांनी सांगितले की प्रस्तावित एजन्सी डिजिटल कर्ज देणाऱ्या ॲप्सची कडक पडताळणी करेल आणि व्हेरिफाइड ॲप्सची सार्वजनिक नोंदणी ठेवेल.
Cyber Fraud|Loan Apps
Cyber Fraud|Loan AppsEsakal
Updated on

Illegal Loan Apps:

वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व कर्ज देणाऱ्या बेकायदेशीर ॲप्सना रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक डिजिटल इंडिया ट्रस्ट एजन्सी (DIGITA) स्थापन करण्याचा विचार करत आहे.

सूत्रांनी सांगितले की प्रस्तावित एजन्सी डिजिटल कर्ज देणाऱ्या ॲप्सची कडक पडताळणी करेल आणि व्हेरिफाइड ॲप्सची सार्वजनिक नोंदणी ठेवेल.

DIGITA ची 'व्हेरिफाइड' स्वाक्षरी नसलेले ॲप्स कायद्याच्या दृष्टीने अनधिकृत मानले जावेत, त्यामुळे डिजिटल क्षेत्रातील आर्थिक गुन्ह्यांविरूद्धच्या लढ्यात हे एक निर्णायक चेकपॉइंट म्हणून काम करेल, असे सूत्रांनी सांगितले.

डिजिटल कर्ज देणाऱ्या ॲप्सची तपासणी करण्याची जबाबदारी DIGITA वर सोपवली जाईल, असे त्यांनी पुढे नमूद केले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पडताळणी प्रक्रियेमुळे वाढत्या डिजिटल कर्ज क्षेत्रात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण करण्यात मदत होईल. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक लोकांना डिजिटल कर्ज देणाऱ्यांच्या पिळवणुकीमुळे जीव गमवावे लागले आहे.

Cyber Fraud|Loan Apps
Honda Motorcycles and Scooters : ‘होंडा’चा सहा कोटींचा टप्पा पार ; देशांतर्गत बाजारपेठेत वाहनविक्रीत विक्रमी कामगिरी

दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 442 डिजिटल कर्ज देणाऱ्या ॲप्सची यादी IT मंत्रालयाला Google सह व्हाइटलिस्ट करण्यासाठी दिली आहे.

याशिवाय, Google ने सप्टेंबर 2022 ते ऑगस्ट 2023 पर्यंत 2,200 हून अधिक डिजिटल लेंडिंग ॲप्स (DLAs) आपल्या ॲप स्टोअरमधून काढून टाकले आहेत.

Cyber Fraud|Loan Apps
कौशल्याच्या आधारे किमान वेतनापासून भारतीय कामगार वंचित, 'India Employment Report 2024'मधून धक्कादायक खुलासे

गुगलने PlayStore वर कर्ज देणाऱ्या ॲप्सच्या अंमलबजावणीबाबत आपले धोरण अपडेट केले आहे. आणि फक्त त्याच ॲप्सना परवानगी दिली आहे, जे RBI च्या नियमन केलेल्या संस्था (REs) द्वारे प्रकाशित केले जातात किंवा REs सह भागीदारीत काम करतात.

Google ने हा धोरण बदल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत वित्तीय सेवा विभाग (DFS) च्या विनंतीवरून केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.