शिरीष देशपांडे
व्हॉट्सॲप हे सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या समाजमाध्यमांपैकी एक समाजमाध्यम आहे. लोकांमधील व्हॉट्सॲपची लोकप्रियता हेरून सायबर चोरटे याचा वापर करून फसवणूक करत आहेत. सध्या व्हॉट्सॲप खाते हॅक झाल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. व्हॉट्सॲपवर एक व्हेरिफिकेशन कोड पाठवून तो शेअर करण्याची विनंती केली जाते आणि नंतर खाते हॅक करून पैसे मागितले जातात. अशा अनेक घटना अलीकडे उघडकीस आल्या आहेत.