किरांग गांधी
या दिवाळीत आपण केवळ संपत्तीच्या निर्मितीशीच नव्हे, तर मनःशांती आणि कृतज्ञतेशी निगडित तत्त्वज्ञान अंगीकारण्याचाही विचार करू शकतो. यासाठी जपानी लोकांच्या ‘आरिगतो’ तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आपण अनेकदा आर्थिक यशाचा संबंध आकडे, धोरणे आणि गुंतवणुकीशी जोडतो; पण जपानी दृष्टिकोनात कृतज्ञता खोलवर रुजलेली आहे. ही भक्कम परंतु, साधीसोपी मानसिकता भारतीयांना आर्थिक शिस्त आणि भक्कम भावनिक संतुलन राखण्यास मदत करू शकते. हे तत्त्वज्ञान तुमच्या पैशाशी असलेल्या नातेसंबंधात कसे बदल करू शकते आणि तुम्हाला अधिक समृद्ध, शांत, आर्थिक भविष्याकडे कसे नेऊ शकते, ते जाणून घेऊ या