Share Market Update : ग्रासिम इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये जबरदस्त ऍक्शन, नवा उच्चांक गाठला...

ग्रासिम इंडस्ट्रीजच्या (Grasim Industries) शेअर्समध्ये सध्या चांगलीच वाढ दिसून येत आहे. या शेअर्सने सलग तिसऱ्या सत्रात विक्रमी उच्चांक गाठला. मंगळवारी एनएसईवर ग्रासिम इंडस्ट्रीजचा शेअर 3.9% वाढला आणि 2369.55 रुपयांवर बंद झाला.
Share Market Update
Share Market Updatesakal
Updated on

ग्रासिम इंडस्ट्रीजच्या (Grasim Industries) शेअर्समध्ये सध्या चांगलीच वाढ दिसून येत आहे. या शेअर्सने सलग तिसऱ्या सत्रात विक्रमी उच्चांक गाठला. मंगळवारी एनएसईवर ग्रासिम इंडस्ट्रीजचा शेअर 3.9% वाढला आणि 2369.55 रुपयांवर बंद झाला. यासह, शेअरने एनएसईवर 2376 रुपयांचा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. सध्या शेअरमध्ये जबरदस्त ऍक्शन पाहायला मिळत आहे. हा शेअर 2700 रुपयांवर जाऊ शकतो असा अंदाज शेअर मार्केट एक्सपर्ट्स व्यक्त करत आहेत.

ग्रासिमच्या एकूण 0.46 लाख शेअर्सचे 10.80 कोटीचे व्यवहार झाले. कंपनीचे मार्केट कॅप 1.61 लाख कोटी झाले आहे. गेल्या एका वर्षात शेअर्स 43 टक्के आणि या वर्षाच्या सुरुवातीपासून 12 टक्के वाढले आहेत. पाच वर्षांत त्यात 172 टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी 24 एप्रिल 2023 रोजी ग्रासिमच्या शेअरची किंमत 52 आठवड्यांच्या नीचांकी 1,649.11 रुपयांवर आली होती.

Share Market Update
Share Market Today: शेअर बाजारात खरेदी होणार? 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष, काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

ग्रासिम स्टॉकची किंमत 2264 रुपयांच्या सपोर्टसह डेली चार्टवर वेगाने वाढत आहे. ग्रासिम इंडस्ट्रीजचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (RSI) 56 वर आहे, जे सूचित करते की हा शेअर ओव्हरबोट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये कोणत्याही झोनमध्ये ट्रेड करत नाहीय.

ग्रासिम इंडस्ट्रीज हे अनेक उद्योगांमध्ये मोठे नाव आहे. ते त्यांच्या व्हीएसएफ उत्पादनांसाठी जागतिक स्तरावर ओळखले जातात. भारतात, ग्रासिम इंडस्ट्रीजचा क्लोर-अल्कली, प्रगत साहित्य, तागाचे धागे आणि कापडांमध्ये मोठा रोल आहे. तसेच, त्यांनी अलीकडेच 2021 पासून पेंट व्यवसायात प्रवेश केला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.