नवी दिल्ली- केंद्र सरकारने नव्या पेंशन स्कीममधील सुधारणेला परवानगी दिली आहे. केंद्राने यूनिफाईड पेंशन स्कीम आणत असल्याचं जाहीर केलं आहे. १ एप्रिल २०२५ पासू ही योजना लागू होणार आहे. या योजनेबाबत अद्याप अनेकांच्या मनामध्ये शंका आहेत. यूपीएस, एनपीएस आणि ओपीएस यामध्ये काय फरक आहे? याबाबत आपण सोप्या शब्दांत समजून घेऊ या.
सरकारी कर्मचाऱ्यांना याआधी जुनी पेंशन स्कीम किंवा नव्या पेंशन स्कीममधून एक पर्याय निवडायचा होता. पण, आता कर्मचाऱ्यांना नवी पेंशन स्कीम आणि यूनिफाईड पेंशन स्कीममध्ये निवड करायची आहे. यूनिफाईड पेंशन स्कीमनुसार कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर बेसिक सॅलरीच्या ५० टक्के पेंशन देण्याची तरतूद आहे.