ॲड. रोहित एरंडे
आजकाल नवी गाडी घेताना बऱ्याचदा जुनी गाडी कंपनीलाच किंवा त्यांच्या जुन्या गाड्यांचा व्यवसाय करणाऱ्या कंपनीला दिली जाते. या व्यवहारादरम्यान जुन्या गाडीबाबतच्या आरटीओ फॉर्म्सवरती सह्यादेखील कार एक्स्चेंज करणाऱ्यांकडून घेतल्या जातात; पण एकतर ती गाडी पुढे कधी विकली जाईल हे माहिती नसते आणि विकली गेल्यावरदेखील आरटीओ रेकॉर्डमध्ये वाहनमालक म्हणून नव्या मालकाचे नाव लागले आहे का? हे तपासण्याचेदेखील बहुतांश लोकांच्या गावी नसते. मात्र, ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. कारण गाडीचा अपघात झाला तर आरटीओ रेकॉर्डमध्ये ज्याचे नाव मालक म्हणून आहे, त्याच्यावरच उत्तरदायित्व येते.