What is ITR forms: विवरणपत्र दाखल करण्यासाठी नेमका कोणता आयटीआर फॉर्म निवडावा?

ITR filing : प्राप्तिकर विभागाकडून सात विविध फॉर्म्स दिले जातात. ITR-१, ITR-२, ITR-३, ITR-४, ITR-५, ITR-६ आणि ITR-७. त्यातून आपण कुठला भरायचा हा प्रश्न पडला असेल ना? तर जरुर वाचा
ITR Filing
ITR FilingE sakal
Updated on

येणारी ३१ जुलै २०२४ ही आर्थिक वर्ष २०२३-२४चे प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम देय तारीख आहे.

प्राप्तिकर विभागाकडून विविध प्रकारचे इन्कम टॅक्स रिटर्न्सचे फॉर्म अधिसूचित केले असून, आजपर्यंत सात विविध फॉर्मचा त्यामध्ये समावेश आहे, जसे की ITR-१, ITR-२, ITR-३, ITR-४, ITR-५, ITR-६ आणि ITR-७.

अशा या विविध प्रकारच्या फॉर्मपैकी नेमका कोणता फॉर्म आपल्याला भरावा लागेल आणि त्याची निवड कशी करावी, हे पाहू या.

सर्वसाधारणपणे कोणता आयटीआर फॉर्म निवडावा, हे त्या-त्या करदात्याच्या उत्पन्नाचे स्त्रोत, उत्पन्नाची रक्कम, तसेच करदात्याची श्रेणी किंवा स्टेटस जसे, व्यक्ती (Individual) आहे किंवा HUF आहे किंवा कंपनी आहे किंवा पार्टनरशिप फर्म आहे आदी बाबींवर अवलंबून असते. आयटीआर-१ ते आयटीआर-४ हे फॉर्म व्यक्ती करदात्याला लागू आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.