नवी दिल्ली : जागतिक बँकेच्या 'ईझ ऑफ डुईंग बिझनेस' अहवालातून भारतासाठीचं आशादायक चित्र समोर आलं आहे. या अहवालानुसार भारतानं २००९ मध्ये असलेल्या १३३ व्या स्थानावरुन २०१९ मध्ये ६३वं स्थान मिळवलं आहे. 1991 मध्येच लायसन्स राज संपुष्टात आल्यानंतर जगातील सर्वात झपाट्यानं वाढत असलेली मोठे अर्थव्यवस्था म्हणून भारताची वाटचाल सुरू झाली होती.
या वाटचाली दरम्यानच आर्थिक उदारीकरणात असलेली अर्थव्यवस्थेत कायापालट करण्याची ताकद पुन्हा एकदा दिसून आली. त्यामुळेच गेल्या दशकात, भारतानं सर्वोच्च पाच जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये स्थान पटकावलं आहे आणि लवकरच अमेरिका आणि चीनच्या पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याच्या मार्गावर आहे.