न अस्कार! लेखणी मोडून हाती कुंचला घेण्याची वेळ आल्यानं गेला आख्खा आठवडा कागद फाडण्यात गेला. बोधचिन्ह स्पर्धेत सहभागी व्हायचं ठरवलं होतं. आगामी ९८वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी दिल्लीत व्हायचंय. .या संमेलनाचं बोधचिन्ह काय असावं? असा प्रश्न निर्माण झाला होता. आमचे परममित्र ‘सरहद’कार संजय नहार यांच्या सुपीक मस्तकात (दिडकीचाही खर्च न करता) अनेक कल्पना सुचत असतात. बोधचिन्हाची खुली स्पर्धाच घ्यावी, अशी आयडिया त्यांनी लढवली. त्यामुळे अनेक घोळ निर्माण झाले, ते सावरण्यात माझा मेलीचा आठवडा गडबडीत गेला…त्याचं झालं असं की, कुठलंही साहित्य संमेलन ठरलं की आधी अध्यक्षपदाचा वाद निर्माण होतो. तो शमवता शमवता संमेलनाच्या बोधचिन्हावर वाद झडतो. तो वाद शमेपर्यंत कार्यक्रमपत्रिकेत अमूक अमूक विषयावर परिसंवाद का नाहीत, याची झाडाझडती होते. ही झाडाझडती सुरु असतानाच प्रमुख अतिथी बोलावण्यावरुन रणकंदन माजलेलं असतं. .सरकारी निधी, भोजन व्यवस्था, निवास व्यवस्था, साहित्यिकांचे मानपान आदी विषयांची डावी बाजू असतेच. या सगळ्या गदारोळात बोधचिन्ह काही योग्य झालेलं नाही, असा सर्वसाधारण निष्कर्ष निघालेला असतो. असं एकही संमेलन नसावं की ज्याचं बोधचिन्ह कलाविश्वाची आणि एकंदरित रसिकांची निर्विवाद दाद घेऊन गेलं…जाऊ दे.आगामी साहित्य संमेलनाचं बोधचिन्ह निर्विवादपणे निर्दोष आणि कलापूर्ण असावं, असा जणू ‘सरहद’कार नहारजींनी चंगच बांधला असणार. त्यांनी एकतर खुली स्पर्धा गपचूप जाहीर करुन टाकली. गपचूप जाहीर म्हंजे काय? असं तुम्ही मला विचाराल. तर ती एक ट्रिक असते. म्हटलं तर गपचूप, पण कुणी विचारलं तर ‘जाहीर केलंय की’ असं सांगायची यात सोय असते. या स्पर्धेमुळे साहित्यिकांमध्ये मात्र गोंधळ उडाला. आपण पुस्तकं लिहावीत की चित्र काढावं? हे अनेकांना कळेना!! काही साहित्यिक खरोखर कागद, रंगपेटी, कुंचले, रंगांची पेनं घेऊन घरी आले म्हणे..बोधचिन्ह खुली स्पर्धा पार पडली. देशभराहून उदंड प्रतिसाद मिळून शंभराहून अधिक चित्रं प्रवेशिकेसह आली. पण ही गपचूप जाहीर केलेली स्पर्धा होती. संपूर्ण जाहीर केलेली असती, तर नुसत्या पुण्यातून लाखभर बोधचित्रं जमा झाली असती! लावता पैज?शंभराहून अधिक चित्रं आली हेच खूप झालं. कारण परीक्षक फार कडक असणार आहेत, असं सांगितलं गेलं होतं. चित्रांचे परीक्षक सामान्यत: चित्रकारच असतात. ही जातच तशी मऊ! अगदी अमोल पालेकर जरी झाले तरी मऊच!! पण परीक्षक कडक असणार म्हटल्यावर बरेच हौशी चित्रकार आपोआप गळफटले. शेवटी शंभरच उरले. .तो शंभर चित्रांचा गठ्ठा कडक परीक्षकांकडे रवाना झाला. आता कडक परीक्षक बारकाईने सगळी चित्र बघणार. त्या चित्रातून सर्वाधिक बोध होणारं, सर्वात कलात्मक चित्र निवडलं जाणार.कडक परीक्षक हे स्वत: दांडगे चित्रकार आहेत. नुसते चित्रकार नसून व्यंगचित्रकार आहेत. नुसते व्यंगचित्रकार नसून अत्यंत कलासक्त, कलाप्रिय असे आहेत. वॉल्ट डिस्नी यांच्या स्टुडिओत जाऊन काम करण्याची त्यांची इच्छा होती. पण ती पूर्ण होत नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी राजकीय पक्षच काढून भरपाई केली, असं ऐकिवात आहे. कळलं ना कोण ते?नन अदर दॅन, आपल्या सर्वांचे लाडके र…र…र…र्राजसाहेब ठाकरे!!दिल्ली साहित्य संमेलनाचं बोधचिन्ह स्वत: राजसाहेब निवडतील, असं जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे एक प्रश्न परस्पर निकालात निघाला आहे. आता ठरलं- बोधचिन्हावर कुणीही वादबिद घालण्याच्या फंदात पडणार नाही!! करेक्ट?.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.