व्यायामात सातत्य राखण्यासाठी!

वर्षाच्या सुरवातीपासून व्यायाम करण्याचा संकल्प राणा भीमदेवी थाटात केला जातो, पण तो तडीस नेणारे हाताच्या बोटावर मोजता येण्याएवढे असतात.
Exercise
ExerciseSakal
Updated on
Summary

वर्षाच्या सुरवातीपासून व्यायाम करण्याचा संकल्प राणा भीमदेवी थाटात केला जातो, पण तो तडीस नेणारे हाताच्या बोटावर मोजता येण्याएवढे असतात.

वर्षाच्या सुरवातीपासून व्यायाम करण्याचा संकल्प राणा भीमदेवी थाटात केला जातो, पण तो तडीस नेणारे हाताच्या बोटावर मोजता येण्याएवढे असतात. ते कसे टाळता येईल, याबाबत काही उपयुक्त सूचना.

नूतन वर्षाच्या उंबरठ्यावर आपल्यापैकी बरेच लोक वेगवेगळे संकल्प करत असतात. त्यापैकी सर्वात मोठ्या प्रमाणात संकल्प केला जातो आणि तो ९० टक्क्यांहून अधिक लोक पाळू शकत नाहीत तो म्हणजे व्यायाम करण्याचा संकल्प. प्रत्येक व्यक्तीला आपली शरीरयष्टी सुंदर ठेवायची असते. सुदृढ राहायचे असते. पण त्यासाठी सातत्याने व्यायाम करणे ठरवूनही शक्य होत नाही. हे असे का होते आणि यामागचे शास्त्र काय आहे हे आपण या लेखामध्ये जाणून घेऊया.

१. अवाढव्य अपेक्षा : आपले शरीर हे होमिओस्टॅसिस म्हणजे, स्वयं-नियमन प्रक्रियाद्वारे स्वतःची स्थिरता टिकवून ठेवते. कोणत्याही व्यक्तीचे शरीर हे काही दिवसांत विचार केल्याप्रमाणे बदलत नाही, त्याला त्याचा असा विशिष्ट वेळ द्यावा लागतो. कमी वेळात व्यायाम करून शरीरबदलाची अपेक्षा ही बऱ्याच लोकांसाठी निराशेचे कारण ठरू शकते. त्या व्यक्तीला व्यायामाच्या सातत्यापासून दूर सारू शकते.

२. सर्वच किंवा काहीही नाही वृत्ती : बऱ्याच वेळा अनेक कारणाने रोज विशिष्ट वेळ व्यायाम करणे शक्य नसते. ज्यावेळी आपल्याकडे कमी वेळ असतो, त्या वेळी बरेच लोक व्यायाम करणे पूर्णपणेच टाळतात. व्यायाम वारंवार टाळत गेल्याने शरीराची व्यायाम करण्याची लय बिघडत जाते. पुढच्या वेळी व्यायाम करणे कठीण होऊन जाते.

३. प्लॅट्यु फेज : जेव्हा तुमचे शरीर तुमच्या वर्कआउट्सच्या मागणीशी जुळवून घेते, तेव्हा प्लॅट्यु फेज (एकसमान पातळी) उद्भवते. प्लॅट्यु फेज दरम्यान व्यायाम करूनही शारीरिक बदल दिसणे अवघड होत असते. त्यामुळे तुम्हाला प्रेरणाहीन वाटू शकते. कारण, तुमच्या वर्कआउट्सचा तुम्हाला कंटाळा येऊ शकतो किंवा तुम्हाला व्यायामशाळेत जावेसे वाटत नाही.

४. मिळून संकल्प करणे : बऱ्याच वेळा आपण अनेक लोक मिळून नवीन वर्षात व्यायाम करायचा असा संकल्प करतो. हे जरी सर्वार्थाने चांगले असले तरी अनेक वेळा एकत्रितपणे केलेला व्यायामाचा संकल्प व्यत्ययाला आमंत्रण देणारा ठरतो. कारण बऱ्याचदा आपला जोडीदार व्यायामासाठी बरोबर नसेल तर आपणही व्यायामाला दांडी मारतो हेच खरे. स्वाभाविकच वरचेवर व्यायाम टाळला गेल्याने त्यातील रुचीही कमी व्हायला लागते.

५. अंतर्गत बदलाला लक्षात न घेणे : तुम्ही तुमच्या प्रगतीचा योग्य प्रकारे मागोवा घेत असतात, असे नसते. प्रत्येक वेळी शरीरात दिसणारेच बदल होतात, असे नसते. अनेकदा शरीरामध्ये भलेही बाहेरून बदल जाणवत नसतील तरी अंतर्गतरित्या बरेच बदल होत असतात. घडामोडी घडत असतात. त्या लगेचच जाणवत नाहीत. आपल्या शरीरात वयोमानाप्रमाणे हार्मोन्सपासून न्यूरोट्रान्समीटर्सपर्यंत न दिसणारे बदल घडत असतात. पण जर आपण दिसणाऱ्या शारीरिक बदलावरच अवलंबून बसलो तर आपण व्यायामासाठी अनुत्सुक होऊ शकतो.

आपण काय करावे?

व्यायामविषयक केलेला संकल्प आपण तडीस नेऊ शकत नाही किंवा त्यात सातत्य राखू शकत नाही. त्यामुळे त्याच्याविषयीची गोडी कमी कमी होत जाऊन आपल्याला व्यायामाचा किंवा फिटनेससाठी काहीतरी करायचे, अशा केलेल्या संकल्पाचा विसर पडायला लागतो. मग अशा स्थितीवर तोडगा तरी कसा काढावा, हा प्रश्‍न पडतोच. तर असेही काही करून पहा.

१. शरीर सुदृढ ठेवणे हा एक प्रवास आहे. त्यामुळे आपण अवाढव्य अपेक्षा न करता रोज व्यायाम करण्यात सातत्य ठेवणे महत्वाचे.

२. ज्या वेळी व्यायामासाठी सवड नसेल अशा वेळी थोडा का होईना पण व्यायाम हा केला पाहिजे. त्यात पूर्णपणे खंड पाडू नये.

३. प्लॅट्यु फेज येणे स्वाभाविक आहे, हे समजून घेऊन व्यायाम प्रकारात बदल करून ती पार करावी.

४. व्यायाम हा स्वप्रेरणेने करावा, त्याबाबत कधीही दुसऱ्यावर अवलंबून राहू नये. त्यांच्यावर विसंबून आपल्या व्यायामाचे नियोजन करू नये.

५. बदल फक्त शारीरिक नसून मानसिकही असतो. त्यामुळे काही दिवस शारीरिक बदल दिसला नाही तरी व्यायाम सातत्यपूर्णरित्या करत राहावा.

(लेखक फिलसॉफ्टस् कंपनीचे सीईओ आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.