नाममुद्रा : बरखा बहार आयी...

निसर्गसंपन्न गोवा ही कलाकारांचीही खाण आहे. गोव्यातील संगीत, गायन, भजन, नाटक याची परंपरा मोठी आहे.
Barkha Naik
Barkha Naiksakal
Updated on

निसर्गसंपन्न गोवा ही कलाकारांचीही खाण आहे. गोव्यातील संगीत, गायन, भजन, नाटक याची परंपरा मोठी आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी गोवा कायमस्वरूपी ठिकाण झाल्यापासून तेथील तरुणाईचा उत्साह व उमेद वाढली आहे. त्यातून चित्रपट क्षेत्रातील सृजनशीलतेला व नवनिर्मितीचा प्रोत्साहन मिळत आहे.

गोव्यातील युवा आता मालिका-चित्रपटांकडे वळू लागले असून पदार्पणातच त्यांना मिळणारे यश त्यांची ऊर्जा वाढविणारे आहेच, शिवाय त्यातून गोमंतभूमीला नवनवे आश्‍वासक चेहरेही मिळू लागले आहेत.

मुंबई नुकत्याच झालेल्या अठराव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (MIFF) गोव्यासाठी अभिमानाची गोष्ट घडली. तरुण चित्रपट दिग्दर्शक-निर्माती बरखा नाईक हिला तिच्या ‘सॉल्ट’ या कोकणी लघुपटसाठी राष्ट्रीय पुरस्कार (Silver Conch) मिळाला आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने मुंबईत आयोजित केलेल्या सात दिवसीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पुरस्कार सोहळ्यात बरखाला ज्येष्ठ चित्रपट निर्माते किरण शांताराम यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून तिने राज्यशास्त्र विषय घेऊन पदवी प्राप्त केली आहे. झेकोस्लोव्हाकियामधील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधून पदवी प्राप्त केली आहे. सुट्टीमध्ये चुलत भावंडांबरोबर फिरताना मोबाइद्वारे काही ना काही चित्रित करण्याची आवड व मित्रांचे प्रोत्साहन यामुळे तिला लघुपटाने आकर्षित केले.

भारतातील लघुपट निर्माते आनंद पटवर्धन यांच्यासोबतही तिने सुमारे दहा महिने कामाचा अनुभव घेतला आहे. विश्व भारद्वाज यांच्या सहाय्यक म्हणूनही तिने काम केले आहे. पुरस्कारानंतर माध्यमांशी बोलताना तिने दिलेली प्रतिक्रिया फार बोलकी व चित्रपट आणि खास करून लघुपट निर्मितीसाठीची तिची असलेली ‘पॅशन’ स्पष्ट करते.

‘हा पुरस्कार मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे. हा चित्रपट खूप प्रेमाने आणि मनापासून बनवला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या निर्मितीत सहभागी झालेल्या प्रत्येकासाठी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मला आनंद होत आहे’’, अशा शब्दांत भावना व्यक्त करणे सहाजिक आहे. पण पुढे बरखाने जे सांगितले ते लक्षात घेण्यासारखं आहे.

‘मला माहिती आहे की लघुपटांची बाजारपेठ खूपच लहान आहे. त्यामुळे, आम्ही लघुपट बनवत असतानाही, लोक नेहमी पूर्ण लांबीच्या चित्रपटाचा आग्रह धरत. म्हणूनच, या पार्श्वभूमीवर, अशा पुरस्काराच्या रूपाने लघुपट निर्मात्यांची जी ओळख निर्माण होते ती नक्कीच नवनिर्मितीला मोठे प्रोत्साहन देणारे आहे’, असे बरखा म्हणते.

‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’...अशी एक म्हण प्रचलित आहे. आणि ती बरखाने खरी करून दाखवली आहे. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते तिला अभिनयासाठीचा बालश्री सन्मानही वयाच्या सातव्या वर्षी मिळाला होता.

काही मिनिटांच्या माहितीपटाला किंवा चित्रपटाला लघुपट (शॉर्ट फिल्म) असे म्हणतात, अशी ‘लघुपटाची’ साधी सोपी व्याख्या आहे. पण यातील ‘काही मिनिटे’ या दोन शब्दांना फार महत्त्व आहे. कमी वेळेत खूप काही सांगण्याची किंवा मोठा संदेश देण्याची ताकद लघुपटामध्ये असते.

‘परिणाम’ हा लघुपटाचा आत्मा असतो. अर्थात लेखक व दिग्दर्शक समर्थ असेल व एखाद्या विषयाकडे बघण्याची वेगळी दृष्टी असेल तरच हे शक्य आहे. बरखाला मिळालेला पुरस्कार लक्षात घेता ‘सॉल्ट’ या लघुपटातून या सर्व गोष्टी साध्य झालेल्या आहेत हे सिद्ध होते.

एका तरुण मुलाच्या आईचे निधन होते. घरी वडील आणि तो मुलगा. मुलाचं वाढतं वय व एकाकी वडील, अशा स्थितीत जे काय घडतं त्यांचे सुंदर चित्रण बरखाने अवघ्या अकरा मिनिटांत केले आहे. मुलगा आणि वडिलांमधील ओढाताण या लघुपटातून दाखविण्यात आली आहे.

संपूर्ण लघुपटात दोघांमध्ये फक्त दोन-तीन वेळाच संवाद होतो. पण जे सांगायचे आहे ते परिणामकारक पद्धतीने सांगण्यात बरखाला यश मिळाले आहे.

एक वेगळा विषय खूप सुंदर पद्धतीने मांडला आहे. आता एका चित्रपटावर तिने लक्ष केंद्रित केले आहे. याची प्रक्रिया प्राथमिक स्तरावर आहे, असे तिने सांगितले. पहिल्याच प्रयत्नाने जे यश मिळाले आहे त्यावरून ‘सॉल्ट’मुळे बरखाची चित्रपटनिर्मितीची गोडी आणखी वाढेल, हे नक्की.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()