हौस ऑफ बांबू
न अस्कार! उदाहरणार्थ आम्ही ‘हिंदू’चा पुढचा पार्ट कधी येणार याची वाट वगैरे बघत बसलो, तर पहाटीच्या अंधारात बेसावध कुतऱ्यावर बिबळ्याने झेप घालावी तसा तंतोतंत कवितासंग्रहच येऊन पडला पुढ्यात, आणि मला स्थिती झाली…
दिवाळी अंकांमधून धड उसंत मिळालेली नाही. अजून किमान दीडशे अंक वाचून व्हायचेत. तेवढ्यात कुणीतरी ‘सट्टक’ हातात ठेवलं. (संभाजी जोशी नव्हेत, प्लीज नोट!) तेही खुद्द नेमाडेसरांच्या स्वाक्षरीसकट. हे म्हंजे थोरच.