रुग्णसेवा आणि तीही लष्करातील असेल तर केवळ औषधोपचार करून भागत नाही तर प्रसंगी जखमीस युद्धस्थळावरून किंवा अपघाताच्या ठिकाणांवरून सुरक्षित ठिकाणी नेण्याची व्यवस्था करण्याचे काम करावे लागते. अशा प्रकारच्या कार्यात आतापर्यंत पुरुषच असायचे; परंतु गेल्या काही दशकांत हे चित्र बदलले असून तर महिलाही आघाडी घेत आहेत. यात आता डॉ. साधना सक्सेना यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल.