स्थळ : अज्ञात. वेळ : अर्थातच मध्यरात्र. प्रसंग : गुप्त मीटिंग (जाहीर)
दादासाहेब : (घाईघाईत दालनात येत) कुणी आहे का इथं? की मीच पहिला आलोय?
भाईसाहेब : (खुर्ची पकडून ऐसपैस) या, दादा! तुम्ही इथंही पहिले नाही! मीच पहिला!!
नानासाहेब : (पाठोपाठ प्रविष्ट होत) तसं बघायला गेलं तर पहिला मीच आहे, पण मी क्लेम सोडला!