जातगणनेची जालीम मात्रा

आरक्षण व त्याभोवतीचे राजकारण याच्याशी संबंध असल्याने जातगणना हा मुद्दा केवळ प्रशासकीय न राहता राजकीयदृष्ट्या कमालीचा संवेदनक्षम बनला आहे. पण तसा तो आहे म्हणून टाळणे हे देशाच्या हिताचे नाही. मधुमेहाची बाधा उघड होऊन नीरस पथ्यकर जिणे नशिबी येईल, या भीतीने रक्ततपासणी टाळणाऱ्या मनुष्यासारखी सध्या देशाची अवस्था झाली आहे.
जातगणनेची जालीम मात्रा
जातगणनेची जालीम मात्रा sakal
Updated on

आरक्षण व त्याभोवतीचे राजकारण याच्याशी संबंध असल्याने जातगणना हा मुद्दा केवळ प्रशासकीय न राहता राजकीयदृष्ट्या कमालीचा संवेदनक्षम बनला आहे. पण तसा तो आहे म्हणून टाळणे हे देशाच्या हिताचे नाही. मधुमेहाची बाधा उघड होऊन नीरस पथ्यकर जिणे नशिबी येईल, या भीतीने रक्ततपासणी टाळणाऱ्या मनुष्यासारखी सध्या देशाची अवस्था झाली आहे. अज्ञानात आनंद मानून जमेल तसे यथेच्छ जगावे, हा दृष्टिकोन आरोग्यपूर्ण म्हणता येणार नाही. जातिनिहाय जनगणना ही अशीच एक तपासणी आहे, जिच्यात आपल्या सामाजिक विणीचा पोत जरतारी आहे की, जाडाभरडा हे वास्तव उघड होईल. जातिनिहाय जनगणनेमुळे जे काही नव्याने भोगावे लागेल, त्याची तयारी नसल्याने सत्ताधारी असल्या भानगडीत पडत नाहीत आणि सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी विरोधक मात्र त्या गणनेची मागणी लावून धरतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.