विश्लेषण
-दीपा कदम
विधान परिषदेचे शतकमहोत्सवी वर्ष २०२२ मध्ये पूर्ण झाले. मात्र कोविडमुळे हा महोत्सव २०२३ पासून साजरा केला जातोय. विधिमंडळाच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रपती दौपदी मुर्मु विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात आज ( मंगळवारी) उपस्थित राहणार आहेत. यावेळी ‘वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व’ या ग्रंथाचे त्यांच्या हस्ते प्रकाशन केले जाणार आहे.
माँटेग्यू- चेम्सफोर्ड यांनी शिफारस केलेल्या सुधारणांचा समावेश करुन १९१९ मध्ये या अधिनियमांतंर्गत मुंबई प्रांतासाठी स्थापलेल्या विधानपरिषदेची प्रारंभिक बैठक १९ फेब्रुवारी १९२१ रोजी मुंबईत ‘टाऊन हॉल’ येथे झाली. त्यावेळी ही ‘बॉम्बे लेजिस्लेटिव्ह कौन्सिल’ होती. प्रथमच नारायण गणेश चंदावरकर यांची, म्हणजेच एका भारतीय व्यक्तीची विधानपरिषदेच्या सभापतिपदी नियुक्ती झाली होती. त्यापूर्वी १८६२ ते १९२० पर्यंत Governor of Bombay यांच्या अध्यक्षतेखाली कौन्सिलचे काम चालत असे.