- डॉ. गुरुदास नूलकर
पृ थ्वीच्या पृष्ठभागावर गोठलेल्या पाण्याच्या प्रदेशाला हिमावरण (‘क्रायोस्फिअर’) म्हटले जाते. बर्फाच्छादित ध्रुवीय प्रदेश, महासागरांचे गोठलेले पाणी, हिमनद्या (ग्लेशियर्स), बर्फाचे तुकडे (आईसबर्ग) आणि दीर्घकाळ बर्फाळ प्रदेश (पर्माफ्रॉस्ट) या सर्वांचा समावेश होतो. क्रायोस्फिअर उच्च अक्षांशांवर (ध्रुवप्रदेश) आणि उच्च उंचीवर (पर्वतरांगा) आढळतात.