अभ्यासक्रमाचे ओझे कमी करण्याबाबत एक सरधोपट विचार एवढाच केला जातो, की त्यातील कठीण किंवा ‘प्रगत’ समजला जाणारा भाग कमी करायचा, गुंतागुंतीचे विषय कमी करायचे. जे प्रश्न सोडवण्यासाठी एकाच वेळी अनेक संकल्पनांचा आधार घ्यावा लागेल, परिचित उदाहरणांपेक्षा वेगळा विचार करावा लागेल, बरेच स्पष्टीकरण लिहावे लागेल, असे प्रश्न परीक्षेत विचारायचेच नाहीत.