‘इतका राजकीय चिखल आजवर कधी बघितला नव्हता’ या आशयाचे उद्गार आपली नेतेमंडळी काढतात आणि हिरिरीने त्याच खेळात उतरतात. अमेरिकेतही तसाच खेळ झाला.
दिवाळीची धामधूम आटोपल्यानंतर जागतिक पटलावर दोन घटना वेगाने घडू लागल्या. दोन्ही घटनांमध्ये काही हजार मैलांचे अंतर आहे, आणि तसे पाहिले तर संबंधही अगदीच बादरायणी.