सुबत्ता, सुविधा, सुखसोई वाढविण्यात तंत्रज्ञानाने मोठी कामगिरी केली. ‘कृत्रिम प्रज्ञे’पर्यंत मजल मारली. माणसापुढे आता आव्हान आहे ते शांतता, सौहार्द, नातेसंबंध सुदृढ करण्याचे. त्यात कसोटी लागेल ‘मानवी प्रज्ञे’ची.
तंत्रज्ञान आणि नवसंशोधनाने गेल्या दोन दशकांमध्ये ‘मनासी टाकिले मागे, गतीशी तुळणा नसे’ असा वेग धारण करीत अशक्यही शक्य करुन दाखविण्याची क्षमता वारंवार सिद्ध केली आहे. नवतंत्रज्ञानाला प्रोत्साहन देत आणि त्याचा भरभरुन अवलंब करीत गेल्या दहा वर्षात भारताने जगात तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक शक्ती होण्यासाठी सिद्धता केली.