न्यायसंस्थेच्या पायाभूत सेवा-सुविधांमध्ये लक्ष घालून न्या. धनंजय चंद्रचूड यांनी भविष्यात अधिक कार्यक्षमतेने काम करणारी व्यवस्था निर्माण केली. परंतु पायाभूत सुविधांपेक्षा महत्त्वाचे असते ते पथदर्शी निकालांचे.
भारतीय राज्यघटनेने लोकशाहीव्यवस्था नीट चालावी, कोणताच स्तंभ वरचढ होऊ नये, यासाठी नियंत्रण आणि संतुलन यांची रचना विचारपूर्वक केली आहे. राज्यघटनेच्या आत्म्याला धक्का बसत नाही ना, याची खबरदारी घेण्याची महत्त्वाची जबाबदारी न्यायसंस्थेवर सोपविली आहे. त्यामुळेच सरन्यायाधीश हे पद भारतीय लोकशाहीतील अत्यंत कळीचे पद आहे.