महिला सहकाऱ्याला मुख्यमंत्री करून केजरीवाल यांनी धूर्तपणाचे दर्शन घडवले आहे.
गमावलेली पत कशी मिळवायची याचा गृहपाठ करुनच अरविंद केजरीवाल राजकारणात आले असावेत. आम आदमीच्या चेहऱ्यामागे दडलेली अतिमहत्त्वाकांक्षा आणि आक्रमक मानसिकतेतून अराजकतेची सीमारेषा ओलांडल्याने केजरीवाल वारंवार अडचणीत आले आहेत. पण त्याचबरोबर अनपेक्षित राजकीय चालींद्वारे संकटातून सहीसलामत बाहेर पडण्याचे कसबही त्यांनी दाखवले आहे.