कॉम्प्युटेशनल थिंकिंग ही विशिष्ट विचारप्रक्रियेद्वारे समस्या सोडविण्याची पद्धत आहे, ज्यामध्ये अनेक तत्त्वे, वैशिष्ट्ये आणि स्वभाव समाविष्ट आहेत.
अनेक प्रकारच्या डिजिटल स्किल्सचा विविध टप्प्यांवरील विकास हा मूलभूत अशा संगणकीय विचारधारेवर (कॉम्प्युटेशनल थिंकिंग) झालेला आहे. संगणकीय कार्यासाठी यापूर्वीच केलेली अनेक सूचनांची क्रमवार मांडणी (अल्गोरिदम) आणि त्या मांडणीद्वारे सिद्धीस जाणारी प्रक्रिया समजून आत्मसात करण्याचे कौशल्य कॉम्प्युटेशनल थिंकिंगमध्ये समाविष्ट आहे.
कॉम्प्युटेशनल थिंकिंग ही विशिष्ट विचारप्रक्रियेद्वारे समस्या सोडविण्याची पद्धत आहे, ज्यामध्ये अनेक तत्त्वे, वैशिष्ट्ये आणि स्वभाव समाविष्ट आहेत. संगणक अॅप्लिकेशन्सच्या विकासासाठी तसेच अनेक कार्यासाठी ही विचार पद्धती आवश्यक आहे. याचा उपयोग गणित, विज्ञान आणि मानव्यविज्ञानासह सर्व विषयांमधील समस्या सोडवण्यासाठीही केला जातो. संगणकीय विचारक्षमता कौशल्ये हा समस्या सोडविण्याच्या पद्धतींचा एक संच आहे. त्यामध्ये समस्या आणि त्यांचे निराकरण हे संगणक कार्यान्वित प्रक्रियांद्वारे करू शकतो. यामध्ये ऑटोमेशनसह प्रक्रिया समजण्यासह विश्लेषणही समाविष्ट आहे.
कॉम्पुटेशनल थिंकिंगद्वारे दैनंदिन जीवनातील अनेक व्यापक समस्या सोडविण्याच्या या विचारधारेच्या तंत्रात चार घटकांचा समावेश आहे, त्यामध्ये विघटन (डिकॉम्पोझिशन), नमुना ओळख (पॅटर्न रेकगनिशन), अमूर्तता (अॅब्सट्रॅक्शन) आणि अल्गोरिदम या कौशल्य प्रक्रियांचा समावेश होतो.
संगणकीय विचारधारेच्या सुसूत्रपणे मांडावयाच्या अनेक सूचनांची निर्मिती ही विविध प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसद्वारे करता येते. याच संगणकीय प्रोग्रॅमिंगचा प्रयत्न करण्यापूर्वी युवकांनी त्यांच्या संगणकीय विचारांचा सराव करणे आणि सुधारणा करणे आणि सक्षमता प्राप्त करणे असे विविध मार्ग संगणकीय व संगणकाधारित करिअरसाठी उपलब्ध आहेत. संगणकीय विचारधारेची तीन मूलभूत वैशिष्ट्य आहेत. त्यामध्ये समस्यांचे सुसूत्रीकरण, स्वयंचलनाद्वारे समाधान अभिव्यक्ती, तसेच विश्लेषण ज्यामध्ये या प्रक्रियांचे उपाय आणि अंमलबजावणीसह मूल्यमापनही करता येते.
कॉम्प्युटेशनल थिंकिंगवर आधारितच मशिन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्ससारख्या अनेक अद्ययावत शाखा उपलब्ध झालेल्या आहेत. विशिष्ट कार्यासाठी केलेल्या ॲप्लिकेशन्समध्ये या संगणकीय विचारधारेचा अभ्यास या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या युवकांनी सर्वप्रथम करणे महत्त्वाचे झाले आहे.
आजच्या काळात संगणकीय विचार क्षमता महत्त्वाची आहे. संगणकीय विचारसरणीचा सर्वांत मोठा फायदा हा आहे की ते वास्तविक जगातील समस्यांचे निराकरण तंत्रज्ञान वापराद्वारे सक्षमपणे करू शकते. संगणकीय विचार फक्त संगणक शास्त्रज्ञ आणि प्रोग्रॅमर वापरत नाहीत तर समाजातील अनेक स्तरांवरील व व्यवसायातील डॉक्टर, शिक्षक आणि कलाकार यासारख्या सर्व प्रकारच्या व्यवसायातील लोक वापरतात.
संगणकीय विचारसरणीचा संदर्भ पहिल्यांदा गणितज्ज्ञ सेमोर पेपर यांनी १९८०च्या दशकामध्ये ‘प्रक्रियात्मक विचार’ म्हणून केला आणि त्यानंतर पुन्हा १९९६मध्ये संगणकाच्या वापरावर संशोधन करताना, संगणकीय विचारसरणीद्वारे समस्या आणि त्याचे निराकरण यांच्यातील संबंध प्रस्थापित करण्यात योगदान दिले. कॉम्प्युटेशनल थिंकिंग हा शब्द पहिल्यांदा जीनेट विंगने २००६मध्ये तयार केला होता आणि २००८मध्ये तो अधिक चांगल्या प्रकारे प्रस्थापित केला.
अलीकडच्या अनेक वर्षांत अभ्यासक्रमाची पुनर्रचना करणाऱ्या असंख्य देशांनी आणि आणि विशेषतः गुगलने या नव्याने विकसित संगणकीय विचारधारेला अत्यावश्यक मानसिकता म्हणून स्वीकारले आहे. संगणकीय विचारधारेवर इनोव्हेशन (सर्जनशीलता) क्षेत्रात कार्य करण्यासाठीची मूलभूत बैठक तयार होऊन विकसित झाली आहे त्यामुळेच या कौशल्याचा उपयोग आता सर्वार्थाने होऊ लागला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.