‘देशात कायदा काहीही असो, मॉलिवूडमध्ये आम्ही ठरवू ते होईल’ अशा मस्तीत जे कोणी असतील, त्यांना वठणीवर आणायलाच हवे.
समानतेची भाषा करणाऱ्या, त्यासाठी राज्यघटनेतही तरतूद करणाऱ्या आपल्या देशात आजही ‘लिंगभाव समानता’ हे तत्त्व केवळ कागदावर राहिले आहे. अद्यापही ते आचरणात उतरलेले नाही, याचे कारण मुळात ते मानसिकतेतच नाही. कोलकाता वा बदलापूरच्या घटनांवरून जनक्षोभ उसळला; परंतु म्हणून तशा घटनांत खंड पडलेला नाही.