गुणवत्तावर्धन आणि सार्वत्रिकीकरण या शिक्षणाच्या दोन्ही आघाड्यांचा सखोल विचार आवश्यक आहे.
नेमेचि येणाऱ्या पावसाळ्याप्रमाणे आता दरवर्षी भारतातल्या विद्यापीठांचे, शिक्षणसंस्थांचे मानांकन केले जाते. अशा प्रकारचे मानांकन आणि वर्गवारी ही पाश्चात्त्य देशांमधील पद्धत आपल्याकडेही रुजू लागली आहे. केंद्र सरकार ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅंकिंग फ्रेमवर्क’ ( एनआयआरएफ)च्या माध्यमातून हे काम करत आहे.