पूर्णपणे दुभंगलेल्या मणिपूरमधील परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी मुळापासूनच उपाययोजना करायला हवी. त्यासाठी राजकीय पुढाकाराची गरज आहे. केवळ लष्करी बळाचा वापर पुरेसा नाही.
भारताच्या ईशान्य भागातील एक राज्य सातत्याने धुमसत, धगधगत राहणे हे देशाच्यादृष्टीनेच एक संकट आहे. पण मणिपूरमधील आग शमविण्याचा मार्ग अद्यापही केंद्र सरकारला सापडलेला नाही, ही बाब नव्याने उफाळलेल्या हिंसाचाराने दाखवून दिली आहे.