एक देश-एक निवडणूक हा प्रस्ताव प्रत्यक्षात येण्याची वाट कमालीची खडतर आहे. सर्व पक्षांचे सहकार्य मिळविण्यात सरकारची कसोटी लागेल.
‘एक सूर ,एक ताल’ या संकल्पनेवर विश्वास असलेल्या विचारमुशीतून बाहेर पडलेल्या नरेंद्र मोदींनी २००९ च्या सुमारास मांडलेला एक महत्त्वाचा प्रस्ताव आता अगदी ऐरणीवर आला आहे. ‘एक देश एक निवडणूक’ ही कल्पना ते सातत्याने मांडत आले आहेत. त्यासंबंधीचा ठराव पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या कार्यकाळातले १०० दिवस पूर्ण करताना मोदींनी मंत्रिमंडळात संमत करुन घेतला.