पाकव्याप्त काश्मीरच्या जनतेने पाकिस्तानविरुद्ध उठाव करण्यासाठी पुढाकार घ्यावा म्हणून प्रोत्साहन देणे हा कूटनीतीचा भाग आहे.
पाकिस्तानच्या नियंत्रणात असलेले पाकव्याप्त काश्मीर खऱ्या अर्थाने ‘आझाद’ होऊन भारताच्या ताब्यात यावे म्हणून मोदी सरकार आक्रमक कूटनीतीचा अवलंब करीत आहे. ‘पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात विलीन होईल’, अशी विधाने केंद्रातील मोदी सरकारकडून अधूनमधून केली जातात, ती त्यामुळेच.