राजकीय पक्ष आणि जनता हे दोघे खरे तर लोकशाहीतले सख्खे पार्टनर, पण आजकाल त्यांच्यामध्येच धड ताळमेळ उरलेला नाही.
दर निवडणुकीच्या आसपास विख्यात हिंदी कवी-लेखक गजानन माधव मुक्तिबोध यांचा एक जुमला हमखास आठवतो. -‘पार्टनर, तुम्हारा पॉलिटिक्स क्या है?’ साठ वर्षांपूर्वीचा हा जुनापुराणा जुमला वापरून इतका गुळगुळीत झाला आहे, तरीही तो आठवतोच. याला कारण आपले राजकीय वास्तव वर्षानुवर्षे तेच राहिले आहे. निवडणुकीचे दिवस म्हणजे तर आपले ‘पॉलिटिक्स’ आपापल्या पार्टनरांपासूनच दडवून ठेवण्याचेच दिवस.