राजकारणात चातुर्य व प्रामाणिकपणा यांच्यातील व्यस्त प्रमाण वाढत गेले, तर समस्या निर्माण होते. नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
अनेकदा सर्वोच्च पदांवरील नेते, न्यायाधीश आणि नोकरशहांना त्यांचा कार्यकाल उरकल्यानंतर सत्य आणि यथार्थाचे स्मरण होते. प्रस्थापित व्यवस्थेतील आपल्या स्थानाला धक्का बसेल, या भीतीमुळे महत्त्वाच्या पदांवर असताना ‘सत्याचे प्रयोग’ करणे बरेचदा परवडणारेही नसते. पण निवृत्तीनंतर मात्र ही मंडळी देशहिताचे, व्यवस्था परिवर्तनाचे बोधामृत मोकळेपणाने जनतेला पाजतात.