वापरकर्त्यांना रस्त्याचा कितीही त्रास झाला तरी टोलवसुली मात्र इमानेइतबारे सुरू आहे. ‘उत्तरदायित्व’ ही गोष्ट लापताच झाली आहे.
पावसाळा येताच खड्डेच खड्डे चोहिकडे, अशी अवस्था सालाबादाप्रमाणे आपल्याकडे तयार होते. यंदाही काही वेगळे घडलेले नाही. राज्यात कोणत्याही महाशक्तीचे, महाआघाडीचे, महायुतीचे सरकार असले तरी ही महासमस्या ठाण मांडून बसलेली आहे. त्याबाबत कितीही आरडाओरड करा, आदळआपट करा, आंदोलने करा, रस्त्यांवरील खड्ड्यात झाडे लावा किंवा त्यात अर्धनग्न बसून आक्रोशदेखील करा, तरीही परिस्थिती काही बदलत नाही.