अखेर ‘शुक्ल’काष्ठ हटले

रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालकपदावरून हटवून निवडणूक आयोगाने विरोधकांना दिलासा दिला असला तरीही शुक्ला यांच्या वादग्रस्त प्रतिमेवर त्यामुळे अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब झाले आहे.
Maharashtra DGP Rashmi Shukla
Maharashtra DGP Rashmi Shuklasakal
Updated on

विविध आरोपांमुळे सतत वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या रश्मी शुक्ला यांना महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदावरून हटविणे भारतीय निवडणूक आयोगाला अखेर भाग पडले. राज्यातील विधानसभा निवडणुकीत सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी असलेल्या शुक्ला यांना महासंचालकपदावरुन हटविल्याशिवाय निःपक्ष आणि पारदर्शक पद्धतीने निवडणूक पार पडूच शकणार नाही, त्यामुळे हटविलेच पाहिजे, अशी मागणी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे गेल्या दीड महिन्यापासून आक्रमकपणाने लावून धरली होती. शुक्ला यांची वादग्रस्त पार्श्वभूमी ठाऊक असूनही निवडणूक आयोगाने या मुद्यावर टोलवाटोलवी चालवली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.