अग्रलेख
भूराजकीय तणाव वाढून उद्भवणारी युद्धजन्य स्थिती, आर्थिक अस्थैर्य आणि महागाई वाढली की सोन्याला झळाळी चढते. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर झालेली २५ टन म्हणजे २५ लाख तोळे सोने खरेदी डोळे दीपवून टाकणारी आहे. पण दिवाळीत सोन्याला आलेली लकाकी अर्थव्यवस्थेची मंदीकडे वाटचाल सुरू झाल्याचीही नकळत जाणीव करून देणारी आहे.