डॉलरप्रभावापासून मुक्तीचे ध्येय साध्य करण्यासाठी ‘ब्रिक्स’ देशांमध्येही दीर्घकाळ एकजूटता असणे तसेच डॉलरला पर्याय देऊ पाहणाऱ्या चलनाची विश्वासार्हता प्रस्थापित होणे महत्त्वाचे.
आंतरराष्ट्रीय वित्तीय प्रणालीवर अमेरिकी डॉलरची मुद्रा अनेक दशकांपासून उमटलेली आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार, गुंतवणूक आणि परकी चलन सीमापार पाठविण्यासारखे ५९ टक्के व्यवहार डॉलरमध्ये होतात. त्यापाठोपाठ २० टक्के व्यवहार युरोमध्ये. म्हणजे सुमारे ८० टक्के आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवहारांवर पाश्चात्त्य देशांचे वर्चस्व आहे. अमेरिका आणि पाश्चात्य देशांचा जगावर दबदबा वाढण्यात डॉलर-युरोची भूमिका महत्त्वाची आहे.