अग्रलेख
प्रत्येक निवडणूक तिचा असा ‘चेहरा’ घेऊन येते. कुठले ना कुठले तत्त्व पणाला लागलेले असले, तर त्यासाठी ती निवडणूक ओळखली जाते. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्यानंतर यावेळच्या संपूर्ण प्रचारावर नजर टाकली तर हा चेहेराच सापडत नाही. इतकी भरकटलेली निवडणूक याआधी कधी झाली असेल असे वाटत नाही. लोक आणि राजकारण/राजकीय प्रक्रिया यांचा सांधा निवडणुकीच्या माध्यमातून जुळला जातो, असे म्हटले जाते. पण यावेळी तेही जाणवले नाही.