रशियाच्या अंगणात पेटलेली आग शमविण्यासाठी ट्रम्प कदाचित कारणीभूत ठरतील, ते त्यांना शांततेचे प्रेम आहे म्हणून नाही. त्यांना अमेरिकेच्या खांद्यावर कोणताही आर्थिक बोजा नको आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार सुरू असतानाच युक्रेन-रशिया युद्धाला पूर्णविराम मिळेल, अशी आशा जगभर निर्माण झाली. याचे कारण रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून प्रचार करताना ट्रम्प यांनी निवडून आल्यानंतर आपण हे युद्ध थांबविण्याला प्राधान्य देऊ, असे आश्वासन वारंवार दिले होते.