पश्चिम बंगालमधील वैद्यकीय विद्यार्थिनीवरील बलात्कार आणि खुनाच्या घटनेने यंत्रणा-व्यवस्थांचे विविध स्तरांवरील विकलांगत्व पुन्हा एकदा समोर आणले आहे.
सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरकीचे पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिचा खून झाल्याच्या घटनेचे संतप्त पडसाद केवळ पश्चिम बंगालमध्ये नव्हे तर देशभर उमटत आहेत. निर्घृण खून आणि अत्याचार यामुळे तर हा प्रक्षोभ उसळलाच; पण त्यानंतरचा सरकारी महाविद्यालय प्रशासनाचा, पोलिस यंत्रणेचा, राजकीय नेतृत्वाचा उदासीन प्रतिसाददेखील या संतापाला कारणीभूत होता.