स्त्रियांना न्याय मिळणे, त्यांना सन्मानाने आणि सुरक्षित जगता यावे, अशी परिस्थिती निर्माण करणे हे राज्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. केवळ कागदावर कठोर कायदे करणे पुरेसे नाही.
समाजातील गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रश्न आला की, सर्वतोमुखी उमटणारी पहिली प्रतिक्रिया असते ती म्हणजे फासावर लटकवा. वाढत्या गुन्हेगारीच्या प्रश्नावर चटकन सांगितला जाणारा उपाय म्हणजे ‘कडक कायदा, कठोर शिक्षा’. या उपायाविषयी बहुतेकजण निःशंक असतात. एखादा गंभीर गुन्हा घडला की लोकभावना एवढ्या तीव्र बनतात की, राजकीय वर्गाला त्याची दखल घ्यावीच लागते.