- डॉ. रिता शेटिया
जैन धर्माचे एक शाश्वत पवित्र पर्व म्हणजेच ‘पर्युषण महापर्व’ सध्या सुरू आहे. धर्म आराधना करण्याचे हे पर्व आहे. त्याची ही माहिती देणारे टिपण.
जैन धर्माचे एक शाश्वत पवित्र पर्व म्हणजेच पर्युषण महापर्व आहे. पापकर्माचे ज्वलन/शमन करून जो आत्मधर्म करून आत्मगुणांना प्रकट करतो ते पर्व म्हणजे पर्युषण पर्व. पर्युषण हा आत्मनिरीक्षण, आत्मपरीकक्षण, आत्मजागरण, आत्मशुद्धी आणि आत्मप्राप्तीचे महान पर्व आहे.