प्रसिद्ध मराठी लेखक महादेव मोरे यांचे निधन झाल्याचे कळले आणि मन अस्वस्थ झाले. अनेक गोष्टी मानसिक पातळीवर दिसत राहिल्या. लेखक म्हणून जगण्याशी संघर्ष करणे किती अवघड असते, याचे ते एक आदर्श उदाहरण होते.
अलीकडेच ‘प्रगतिशील लेखक संघ, महाराष्ट्र’ यांच्या वतीने तीन दिवसांचे साहित्य संमेलन रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षपदी कोण असावे, यावर एकमत होता होत नव्हते. महादेव मोरे यांचे नाव सुचवले गेले आणि चटकन त्यावर एकमत झाले.