- डॉ. माधव शिंदे
शेतकरी आणि कामगार वर्गासाठी लाभाच्या योजनांपेक्षाही शेतमालाला रास्त भाव आणि रास्त वेतन मिळाले तर तोच त्यांचा खरा सन्मान होय,असे म्हणता येईल. सध्याचे यासंदर्भातील चित्र काय आहे, याचा आढावा.
सध्या महाराष्ट्रात एकीकडे विधानसभेच्या निवडणुकांचे पडघम राज्यात घुमू लागले असून सर्वच राजकीय पक्ष निवडणुकांची जोरदार तयारी करीत आहेत. निवडणुकांची पूर्वतयारी म्हणून सत्ताधारी पक्षाने प्रसिद्धीच्या योजनांचा धडाका लावलेला पहायला मिळतो. विविध योजनांची सरबत्ती चालू आहे. मदत, सवलतींची खैरात होत आहे. पण दुसऱ्या बाजूला खरीप पिकांचा हंगाम पूर्ण होऊन शेतमाल बाजारपेठेत येण्यास सुरुवात झाली आहे.